कोलकाता - आम्ही शहरात आयोजित केलेल्या रॅलीला जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील जवळपास सर्वच नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामुळे निराश झालेल्या टीएमसीच्या गुंडानी आमच्या रॅलीवर हल्ला केला, असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे.
शाह म्हणाले, की गोंधळ उडालेला असतानाही रॅली व्यवस्थित सुरु राहिली. नियोजित वेळी व नियोजित ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी अभिनंदन करतो.
कोलकाता येथील रॅलीमध्ये झालेल्या गोंधळाचा शाह यांनी निषेध केला. बंगालच्या नागरिकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून या घटनेला उत्तर द्यावे. राज्यातील हिंसाचाराचा अंत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून दूर करणे आवश्यक असल्याचे शाह म्हणाले.