ETV Bharat / bharat

'केजरीवालांनी दिल्लीला विषारी बनविले' - AMIT SHAH NEWS

गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

गृहमंत्री अमित शाह
गृहमंत्री अमित शाह
author img

By

Published : Jan 25, 2020, 6:52 PM IST

नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला विषारी बनविले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीकरांना विषारी पाणी आणि हवा दिली आहे, असे शाह म्हणाले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित प्रचार सभेत ते म्हणाले.

केजरीवाल यांनी घरोघरी पाईप लाईनच्या माध्यमातून शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिल्लीकरांना विषारी पाणी दिले. केजरीवाल यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. मी त्यांच्यावर टीका केली की, ते लगेचच टि्वट करून प्रतिउत्तर देत आहेत, असे शाह म्हणाले. तसेच मणिपूर, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि आसाममध्ये भाजपने विजय प्राप्त केला आहे. दिल्लीमध्येही भाजपच विजयी होणार, असा विश्वास शाह यांनी सभेत व्यक्त केला.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Intro:Body:

'केजरीवालांनी दिल्लीला विषारी बनविले'

नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.  अरिविंद केजरीवाल यांनी दिल्लीला विषारी बनविले आहे.  केजरीवाल यांनी दिल्लीकरांना विषारी पाणी आणि हवा दिली आहे, असे शाह म्हणाले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित प्रचार सभेत ते म्हणाले.

केजरीवाल यांनी घरोघरी पाईप लाईनच्या माध्यमातून शुद्ध पाणी  देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिल्लीकरांना विषारी पाणी दिले. केजरीवाल यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. मी त्यांच्यावर टीका केली की, ते लगेचच टि्वट करून प्रतिउत्तर देत आहेत, असे शाह म्हणाले. तसेच मनिपूर, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि आसाममध्ये भाजपने विजय प्राप्त केला आहे. दिल्लीमध्येही भाजपच विजयी होणार, असा विश्वास शाह यांनी सभेत व्यक्त केला.

 दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.