हैदराबाद - जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यातुन जगभरातील आरोग्य सुविधेतील ढिसाळपणा समोर आला आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रामध्ये पाण्यासारखी मूलभूत सुविधाही नसल्याचं धक्कादायक वास्तव या अहवालातून समोर आलं आहे. त्यामध्ये सामान्य लोकांचे आरोग्यही धोक्यात असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. आरोग्य केंद्रात काम करणारे कर्मचारी आणि तेथे उपचार घेणारे सुमारे 200 कोटी सर्वसामान्य नागरिकांना पाण्याच्या सुविधेअभावी कोरोनाचाही धोका असल्याचाही युनिसेफनं म्हटले आहे.
पाणी स्वच्छता न ठेवता आरोग्य सेवा सुविधेशिवाय काम करणं म्हणजे नर्स आणि डॉक्टर वैयक्तिक संरक्षक उपकरणांशिवाय काम करण्यासारखं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य सेवांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. मात्र, काही देशांमध्येही अद्याप त्या नाहीत.
'ग्लोबल प्रोग्रेस रिपोर्ट ऑन वॉश इन हेल्थ केअर फॅसिलिटीज: फंडामेंटल फर्स्ट' या अहवालाने आरोग्य यंत्रणेतील असुरक्षितता दर्शवली आहे. रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱयांना अत्यंत गरजेच्या असलेली सुविधा म्हणजेच पाणी, सॅनिटेशन आणि हायजिन. मात्र, त्यांना त्या पुरवल्या गेल्या नसल्याचे समोर आले आहे.
अहवालात चार मुख्य शिफारसी आहेत -
जगातील सर्वांत कमी विकसीत देश असलेल्या 47 देशामध्ये सर्वांत वाईट परिस्थिती आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. तर काही देशामध्ये सॅनिटेशनची व्यवस्था नाही. मात्र, ही परिस्थीती सुधारता येऊ शकते, असे म्हटलं आहे. अहवालात चार मुख्य शिफारसी आहेत. त्यानुसार रुग्णालयातील पाणी, सॅनिटेशन आणि हायजिन सुविधा सुधारण्यासाठी एक योग्य आर्थिक नियोजनासह आराखडा करणं महत्त्वाचे आहे. तसेच त्यांची नियमीतपने प्रगती पुनरावलोकन करणं महत्त्वाचे आहे.
हेही वाचा - फक्त कुशल कामगारांमुळेच होईल प्रगती