कोलकाता- मोहम्मद शमी विरूद्ध घरगुती हिंसाचारबद्दल कोलकाताच्या अलीपूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. घरगुती हिंसाचारबद्दल शमीच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
न्यायालयाच्या या आदेशानंतर शमीकडे या खटल्यात जामीन मिळवण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे. १५ दिवसांच्या आत त्यांना जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे. २००८ मध्ये शमी यांची पत्नी हसीन जहान यांनी शमीविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर शमी आणि त्याच्या भावावर घरगुती हिंसाचारबद्दल आय.पी.सी च्या कलम ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हसीन जहानने जेव्हापासून त्यांच्यावर आरोप लावले तेव्हापासून शमीने न्यायालयात जायचे टाळले आहे. त्यामुळे न्यायालयाला उपरोक्त निर्वाळा द्यावा लागला. २०१९ साली एप्रिल महिन्यात शमी यांच्या पत्नीने त्यांच्या घरी जावून गोंधळ माजवला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या अमरोहा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. मात्र नंतर तिला जामीन देण्यात आला होती.