ETV Bharat / bharat

भारताची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत, सत्य स्वीकारायला हवे - सचिन पायलट

भारतातील आणि जगभरातील सर्व्हे हे सांगत आहेत की अर्थव्यवस्था ही वाईट स्थितीत आहे. त्यामुळे ते स्वीकारून त्यावर टीका करण्याऐवजी, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले आहे.

Sachin Pilot
author img

By

Published : Sep 19, 2019, 7:48 PM IST

जयपूर : भारत आणि जगभरातील सर्वेक्षणातून हेच समोर येत आहे की अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज व्यक्त केले.

  • Sachin Pilot, in Jaipur: We'll have to accept that when formula of calculating figures of economy was changed, GDP was automatically increased by 2%. Figures say that the biggest problem is unemployment. Concrete steps should be taken to balance the macro-economic environment.

    — ANI (@ANI) September 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतात आज प्रत्येक क्षेत्रात मंदी आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास संपुष्टात आला आहे, एनपीए वाढले आहेत, बँका कर्ज देत नाहीत, रोजगार निर्मिती होत नाहीये आणि कारखाने बंद पडले असून हे सर्वांना दिसत आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आधी ती वाईट स्थितीमध्ये आहे हे स्वीकारले पाहिजे. नंतर, त्यावर टीका करण्याऐवजी, त्यासाठीचे उपाय सुचवले गेले पाहिजेत. जीडीपी मोजण्याचे निकष आणि पद्धत बदलल्यामुळे जीडीपी आपोआपच २ टक्के जास्त वाटत होता. त्यात खरोखर दोन टक्क्यांची वाढ झाली नव्हती हे आपण मान्य करायला हवे. तसेच, सर्व आकडे हेच सांगत आहेत की, आपल्यापुढील सध्याची सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. हे सर्व लक्षात घेता, एकूणच अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा : जीडीपी ५ टक्क्यांवर जाणे आश्चर्यकारक, मात्र अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल - शक्तीकांत दास

Intro:Body:

भारताची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे हे सत्य स्वीकारायला हवे : सचिन पायलट

भारतातील आणि जगभरातील सर्व्हे हे सांगत आहेत की अर्थव्यवस्था ही वाईट स्थितीत आहे. त्यामुळे ते स्वीकारून त्यावर टीका करण्याऐवजी, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले आहे.

जयपूर : भारत आणि जगभरातील सर्वेक्षणातून हेच समोर येत आहे की अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज व्यक्त केले.

भारतात आज प्रत्येक क्षेत्रात मंदी आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास संपुष्टात आला आहे, एनपीए वाढले आहेत, बँका कर्ज देत नाहीत, रोजगार निर्मिती होत नाहीये आणि कारखाने बंद पडले आहेत. आणि हे सर्वांना दिसत आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आधी ती वाईट स्थितीमध्ये आहे हे स्वीकारले पाहिजे. नंतर, त्यावर टीका करण्याऐवजी, त्यासाठीचे उपाय सुचवले गेले पाहिजेत.

जीडीपी मोजण्याचे निकष आणि पद्धत बदलल्यामुळे जीडीपी आपोआपच २ टक्के जास्त वाटत होता. त्यात खरोखर दोन टक्क्यांची वाढ झाली नव्हती हे आपण मान्य करायला हवे. तसेच, सर्व आकडे हेच सांगत आहेत की, आपल्यापुढील सध्याची सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. हे सर्व लक्षात घेता, एकूणच अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.