ETV Bharat / bharat

कोरोनामुळे हज यात्रा रद्द...भाविकांना एक महिन्याच्या आत पैसे माघारी मिळणार - हज यात्रा रद्द बातमी

यावर्षी भारतातून हज यात्रेसाठी 2 लाख 13 हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 16 हजार जणांनी तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, आता सर्व अर्जदारांचे पैसे माघारी करण्यात येणार आहेत.

हज यात्रा
हज यात्रा
author img

By

Published : Jun 24, 2020, 7:08 PM IST

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने बाहेरील देशांतून येणाऱ्या हज यात्रेकरूंना मनाई केली आहे. त्यामुळे आरक्षण केलेल्या सर्व यात्रेकरूंना एका महिन्याच्या आत सर्व पैसे माघारी मिळणार असल्याचे हज कमिटी ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. समितीचे कार्यकारी अध्यक्ष मखसुद अहमद खान यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही सौदी सरकारच्या निर्णयानुसार हज यात्रेला भाविकांना जाता येणार नसल्याचे सांगितले आहे. भाविकांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया भाविकांनी करू नये, असे हज कमिटीने म्हटले आहे.

यावर्षी हज यात्रा रद्द झाली असली तरी यावर्षीचे तिकीट पुढील वर्षासाठी आरक्षित करण्याची मागणी अनेक राज्य हज कमिटींनी केली होती. त्यावर बोलताना नक्वी म्हणाले की, याबाबचा निर्णय पुढील वर्षीच्या हज यात्रा नियोजनाच्या वेळी घेण्यात येईल. यासंबंधी आत्ता कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, यावर्षी 2 हजार 300 पेक्षा जास्त महिलांनी कोणीही सोबती न घेता एकटे हज यात्रेला जाण्यासाठी तिकिट आरक्षित केले होते. त्यांना 2020 च्या अर्जाच्या आधारे 2021 च्या हज यात्रेला जाता येणार आहे.

2 लाख 13 हजार अर्ज

यावर्षी भारतातून हज यात्रेसाठी 2 लाख 13 हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 16 हजार जणांनी तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, आता सर्व अर्जदारांचे पैसे माघारी करण्यात येणार आहेत. सोमवारी सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंना येण्यास मज्जाव केला आहे. देशात आधीपासून राहत असलेल्या विविध देशातील ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत हज यात्रा होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.