लखनऊ - उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एका महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाला एक शरीर, दोन तोंड, चार हात आणि दोन पाय आहेत. बाळाच्या पोटाचा भाग एकत्र चिकटलेला आहे. दोन तोंडाच्या बाळाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे. बाळ अगदी सुदृढ असून रूग्णालयात बघ्यांची प्रचंड गर्दी होत आहे.
अलीगढच्या जट्टारी गावातील आशा कार्यकर्त्या सीमा यांनी टप्पल भागातील सार्वजनिक रुग्णालयात सोमवारी रात्री शमा नावाच्या महिलेला प्रसुतीसाठी दाखल केले. रुग्णालयातील परिचारीका प्रिती सिंह यांनी महिलेची प्रसुती केली. तेव्हा त्यांना दोन तोंड असलेल्या बाळाला पाहून धक्का बसला. महिलेने अल्ट्रासाउंड केले होते. तेव्हा त्यांना जुळे बाळ होणार असल्याचे कळाले. मात्र, प्रसुतीनंतर एकाच बाळाला दोन तोंड असल्याचे समोर आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
यापूर्वीच्या अशाच घटना -
राजस्थानच्या पाली जिल्ह्यात गेल्या जानेवरीमध्ये एका खासगी रूग्णालयात महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला होता. त्या बाळाला दोन डोकं, दोन हातांसोबत दोन पोट होते. तर 2017 मध्ये महारष्ट्रातील बीड जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली होती. एका महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला होता. सदरील बाळाचे वजन 3 किलो 700 ग्रॅम होते. तर त्यला दोन डोके, दोन किडणी आणि दोन फुफ्फुससे होते.