जयपूर- नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. यावर सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्गाचे दिवाण सय्यद जनुवाल आबेदीन अली खान यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, तबलिगी जमातवर कठोर कारवाई केली पाहिजे.
हेही वाचा- तबलीग जमातीचे २५ धर्मप्रचारक कल्याणमधून ताब्यात; सर्वांची शासकीय क्वारंटाईन केंद्रात रवानगी
सय्यद जैनुवल आबेदीन अली खान यांनी करकझ मधील धार्मिक कार्यक्रमासाठी झालेल्या गर्दीचा निषेधही केला आहे. मरकझ यांच्यावर कारवाई करावी, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. तसचे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी समोर येऊन तपासणी करावी. कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना संघटीत होऊन कोरोना विषाणूचा पराभव करावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.