नवी दिल्ली - वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रिय मंत्री अजय माकन यांनी दिल्लीतील कोरोनाच्या परिस्थितीवरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात(एनएचआरसी) धाव घेतली आहे. दिल्लीमधील 70 टक्के रुग्णालये कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवावी, असा आदेश सरकारला देण्याची मागणी त्यांनी एनएचआरसीकडे केली आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण 10 टक्के झाल्यानंतरच लॉकडाऊन उठवावा, असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत सध्या 27 टक्के कोरोना बाधित रुग्ण आहेत. दिल्लीतील लोकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
दिल्लीमधील खासगी आणि सरकारी रुग्णालये फक्त दिल्लीकरांसाठी राखीव ठेवावी असा निर्णय केजरीवाल यांनी घेतला होता. मात्र, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी हा निर्णय रद्दबात ठरवला. दिल्लीतील रुग्णालयात सर्वांना उपचार मिळायला हवेत, फक्त दिल्लीकरांसाठी रुग्णालये राखीव ठेवता येणार नाहीत, असे म्हणत हा निर्णय घेण्यात आला. यावर दिल्लीपुढे मोठे आवाहन असल्याचे केजरीवाल म्हणाले.