नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील हवेचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. सद्यस्थितीत राजधानीमधील हवेचा स्तर ६२५ पर्यंत खालावला आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. पुढील दोन दिवस प्रदुषणाची तीव्रता कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मात्र, तरीही नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.खराब हवेमुळे ३२ विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये हवेचा स्तर ६२५ निर्देशांकावर पोहचला आहे. मात्र, हवेचा स्तर ९०० निर्देशांकापर्यंत पोहचला असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळेही प्रदूषण कमी झाले नाही. प्रदूषणाचा जोर कमी होण्यासाठी पुढील सोमवारपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
-
Delhi Airport statement: Due to low visibility at Delhi Airport 32 flights have been diverted. pic.twitter.com/k46FNSaSmv
— ANI (@ANI) November 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi Airport statement: Due to low visibility at Delhi Airport 32 flights have been diverted. pic.twitter.com/k46FNSaSmv
— ANI (@ANI) November 3, 2019Delhi Airport statement: Due to low visibility at Delhi Airport 32 flights have been diverted. pic.twitter.com/k46FNSaSmv
— ANI (@ANI) November 3, 2019
लोकांना घराबाहेर पडता येईना
प्रदुषणामुळे नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे शहरामध्ये आरोग्य आणिबाणी आली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी व्यायामासाठी तसेच दिवसभर नागरिक मास्क लावून बाहेर पडत आहेत. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.