ETV Bharat / bharat

सावधान!  दिल्लीतील प्रदुषण पुन्हा धोकादायक स्तरावर, लोधी रोडवरील हवा सर्वात जास्त विषारी - pollution in delhi

राजधानी दिल्लीमधील हवा प्रदुषण पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरूवात झाली आहे. बुधवारी दिल्लीतील एअर क्लालिटी इंडेक्स (एआयक्यु) म्हणजेच हवेचा निर्देशाकं ४५७ अंकावर पोहचला आहे.

दिल्लीतील हवा प्रदुषण
author img

By

Published : Nov 13, 2019, 9:57 AM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमधील हवा प्रदुषण पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला सुरूवात झाली आहे. आज (बुधवारी) दिल्लीतील एअर क्लालिटी इंडेक्स (एआयक्यु) म्हणजेच हवेचा निर्देशांक ४५७ अंकावर पोहचला आहे. मागील आठवड्य़ात प्रदुषणापासून थोडी उसंत मिळाल्यानंतर दिल्लीकर पुन्हा एकदा प्रदुषणाच्या विळख्यात अडकले आहेत.

  • Delhi: Major pollutants PM 2.5 at 500 & PM 10 at 497, both in 'severe' category in Lodhi Road area, according to the Air Quality Index (AQI) data. pic.twitter.com/BOB87hfyOc

    — ANI (@ANI) November 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सतत प्रदुषण वाढत असताना मागील आठवड्यामध्ये प्रदुषण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा पाऊस आणि दमट हवामानामुळे हवेचा स्तर बिघडण्यास सुरुवात झाली. आज(बुधवारी) सकाळी अनेक परिसरांमध्ये हवेचा स्तर ४०० पेक्षा जास्त होता.

दिल्लीतील लोधी रोडवरील हवा प्रदुषण सर्वात जास्त असून तेथील हवेचा निर्देशांक ५०० पर्यंत पोहचला आहे.

दिल्ली एनसीआर म्हणजेच राजधानीच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही हवेचा स्तर खालावला आहे.

नोयडा, गाझियाबाद आणि फरिदाबादमध्येही हवा प्रदुषण धोक्याच्या पातळीवर पोहचले आहे.

नोयडा सेक्टर ६२ मध्ये हवेचा निर्देशांक ४७२ तर फरिदाबादमधील सेक्टर १६ मध्ये हवेचा निर्देशांक ४४१ वर पोहचला आहे. ग्रेटर नोयडातील भागातील नॉलेज पार्क भागात हवेचा स्तर आज सकाळी ४५८ होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.