ETV Bharat / bharat

…तरीही सह-वैमानिक अखिलेश कुमार कर्तव्यावर झाले होते रुजू - Co pilot Akhilesh Kumar

सह-वैमानिक अखिलेश कुमार यांनी एअर इंडियात 2017 मध्ये आयएक्स-1344 या विमानाच्या पहिल्या उड्डाणापासून सहवैमानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह 19 जणांचा कोझीकोड विमानतळावरील अपघातात मृत्यू झाला आहे.

 सह-वैमानिक अखिलेश कुमार
सह-वैमानिक अखिलेश कुमार
author img

By

Published : Aug 8, 2020, 4:01 PM IST

लखनौ - कोझीकोड विमानतळावर झालेल्या अपघातात सह-वैमानिक अखिलेश कुमार यांचे निधन झाले. त्यांची गर्भवती पत्नी पंधरा ते सतरा दिवसांत मुलाला जन्म देणार आहे. अशा स्थितीतही अखिलेश कुमार 'वंदे भारत' मोहिमेमध्ये भारतीयांना विदेशातून आणण्यासाठी कर्तव्यावर रुजू झाले होते.

सह-वैमानिक अखिलेश कुमार यांनी एअर इंडियात 2017 मध्ये आयएक्स-1344 या विमानाच्या पहिल्या उड्डाणापासून सहवैमानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह 19 जणांचा कोझीकोड विमानतळावरील अपघातात मृत्यू झाला आहे.

त्यांचा 2017 मध्ये मेघा यांच्याबरोबर विवाह झाला. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर ते एकदा मूळगावी परतले होते. अचानक व अनेपेक्षितपणे विमान अपघातात कुमार यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ते गोविंदनगरमधील पोथूरा कुंद येथील रहिवासी होती. मृत्यूपश्चात त्यांना पत्नी मेघा, मोठी बहिण आणि दोन लहान भाऊ आहेत. त्यांचे पार्थिव आज मथुरामध्ये आणण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य हे केरळमध्ये रवाना झाल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसने दिली.

अखिलेश कुमार यांचे चुलत भाऊ वसुदेव म्हणाले, ते खूप शांत, नम्र आणि चांगले होते.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विमान अपघातामधील मृताच्या नातेवाईकांना तात्पुरता दिलासा म्हणून 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना 2 लाख रुपये व किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.