नवी दिल्ली - एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसवर टीका केली आहे. तुम्ही मोदींच्या नावावर नेहमीच जिंकू शकत नाही. हे हरियाणामधील निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तर काँग्रेसनं हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये चांगले काम न केल्यामुळे दोन्ही राज्यामधील प्रादेशिक पक्षांना यश आले असल्याचं असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रामध्ये आम्ही मतधिक्याने जिंकून येऊ, असा दावा भाजपने केला होता. मात्र भाजपला अपेक्षित होता असा निकाल लागला नाही. याचबरोबर भाजपला हरियाणामध्ये सुद्धा बहूमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपने धु्र्वीकरणाचे राजकारण सोडून देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि ग्रामीण भागातील समस्यांवर लक्ष द्यायला हवे, असा टोला ओवेसी यांनी भाजपला लगावला आहे.
मोदींनी हरियाणामध्ये १२ ते १५ प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र भाजपला बहूमत मिळाले नाही. मोदींच्या लोकप्रियतेवरून तुम्ही नेहमीच जिंकून येऊ शकत नाही. हे हरियाणामधील निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे भाजपसाठी हीच धोक्याची घंटा असून भाजपने जागे व्हायला हवे, असे ओवेसी म्हणाले. काँग्रेस पक्षाने हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये चांगले कार्य न केल्यामुळेच प्रादेशिक पक्षांना यश मिळाले असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.
-
AIMIM Chief Asaduddin Owaisi: It is a wake up call for BJP, you can't win on PM Modi's popularity every time. Despite the fact that PM conducted 12-15 rallies in Haryana, they did not get the expected results. So things are changing. https://t.co/CtGatOlL3d
— ANI (@ANI) October 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AIMIM Chief Asaduddin Owaisi: It is a wake up call for BJP, you can't win on PM Modi's popularity every time. Despite the fact that PM conducted 12-15 rallies in Haryana, they did not get the expected results. So things are changing. https://t.co/CtGatOlL3d
— ANI (@ANI) October 24, 2019AIMIM Chief Asaduddin Owaisi: It is a wake up call for BJP, you can't win on PM Modi's popularity every time. Despite the fact that PM conducted 12-15 rallies in Haryana, they did not get the expected results. So things are changing. https://t.co/CtGatOlL3d
— ANI (@ANI) October 24, 2019
दरम्यान आज महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. भाजपला महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये बहूमत मिळाले नसून इतर पक्षांना सोबत घेऊन भाजप दोन्ही राज्यामध्ये सरकार स्थापन करू शकते.