नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त एएन-३२ विमानाच्या अवशेषाजवळ हवाई दलाचे शोध पथक आज सकाळी पोहोचले आहे. मात्र, घटनास्थळी या पथकाला मृतांचे कोणतेही अवशेष आढळून आले नाहीत. हवाई दलाने मात्र अपघाततील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मृत घोषीत केले आहे.
हवाई दलाचे एएन-३२ हे विमान ३ जूलैला अरुणाचलच्या एका जंगलात कोसळले होते. या विमानात हवाई दलाचे १३ अधिकारी आणि कर्मचारी प्रवास करत होते. रडारपासून या विमानाचा संपर्क तुटल्यापासून शोधमोहीम सुरू होती. तब्बल ८ दिवसांनंतर या विमानाचे अवशेष हवाई दलाच्या कॅमेरॅत कैद झाले. मात्र, या अवशेषांजवळ पोहोचण्यास पाऊस आणि धुक्यामुळे शोधपथकाला अडचणी येत होत्या. अखेर आज पहाटे ८ जणांचे शोधपथक अपघातग्रस्त विमानाजवळ पोहोचले. यावेळी या पथकाने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर कोणत्याही व्यक्तीच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले नाही. त्यामुळे या घटनेतील गुढ कायम आहे.
या विमानात हवाई दलाचे विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्कॉड्रन लीडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाईट लेफ्टनंट आशिष तन्वीर, फ्लाईट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एम. के. गर्ग या अधिकाऱ्यांसह , के. के. मिश्रा, अनुप कुमार, शेरीन, एस, के. सिंग, पंकज, पुतळी आणि राजेश कुमार, यांचा मृत्यू झाल्यचे हवाई दलाने जाहीर केले आहे.
हवाई दलाने या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शूर वैमानिकांना ट्विटरवरून आदरांजली वाहीली आहे.