बंगळुरू - कर्नाटक सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेस नेत्यांची रविवारी बैठक घेतली जाणार आहे. ताज हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. कुमारस्वामी सरकार २२ जुलै रोजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाईल.
या बैठकीआधी सीएलपी अध्यक्ष सिद्धारामैय्या, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा आणि कर्नाटक काँग्रेसचे आमदार यांची एक बैठक शनिवारी पार पडली. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याचा दबाव कायम आहे. यासाठी त्यांना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही आणि याआधीचीही मुदत कुमारस्वामी सरकारला पाळता आली नाही. त्यामुळे आता सोमवारी (दि.२२ जुलै) कर्नाटक सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
१६ आमदारांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या तेरा महिन्यातच कर्नाटक सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले. कर्नाटक राज्य विधानसभेत एकूण २२५ सदस्यसंख्या आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी ११३ पेक्षा अधिक सदस्यसंख्या आवश्यक आहे.