ETV Bharat / bharat

राज्यसभा निवडणूक : गुजरातमधील काँग्रेस आमदार राजस्थानातील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये - गुजरात काँग्रेस आमदार राजीनामे

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तीन आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. अधिक खबरदारी म्हणून काही आमदारांना राजस्थानातील आबू रोड येथील वाइल्डविंड्स रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. शनिवारी हे आमदार या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

गुजरात राज्यसभा न्यूज
गुजरात राज्यसभा न्यूज
author img

By

Published : Jun 7, 2020, 12:56 PM IST

आबू रोड - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तीन आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. पडझड टाळण्यासाठी त्यांनी पक्षातील इतर आमदारांशी संपर्क साधून त्यांना गुजरातमधील विविध हॉटेल, खासगी बंगल्यांमध्ये ठेवले होते. मात्र, आता अधिक खबरदारी म्हणून काही आमदारांना राजस्थानातील आबू रोड येथील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. शनिवारी हे आमदार या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेसचे हे चार आमदार गुजरात-राजस्थान सीमेजवळील अंबाजी येथे दिसले होते. याविषयी अधिक माहिती घेतली असता, त्यांना राजस्थानातील आबू रोड येथील वाईल्डविंड्स रिसॉर्टमध्ये नेण्यात आल्याचे समजले आहे. याआधी काँग्रेसने मार्चमध्ये आपल्या आमदारांना जयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये पाठवले होते. तेव्हा 26 मार्चला प्रस्तावित असलेल्या राज्यसभा निवडणुकांआधी त्यांच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार गुलाबसिंग राजपूत म्हणाले की, ज्या लोकांना दगा द्यायचा होता, त्यांनी पक्ष सोडला. ‘राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर येथे चर्चा केली जाईल. कोणताही आमदार पक्ष सोडणार नाही. ज्या लोकांना लोकांचा विश्वासघात करायचा होता, त्यांनीच पक्ष सोडला. जनमताचा अनादर करणाऱ्या आणि पक्ष सोडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही,’ असे राजपूत यांनी माध्यमांना सांगितले.

राज्यसभा निवडणुका 19 जून रोजी होणार आहेत. काँग्रेसने वरिष्ठ नेते भरत सिंह सोलंकी आणि शक्तिसिंह गोहिल यांना या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहे. मात्र, सदस्यांची संख्या घटून 65 झाल्यानंतर पक्षाला राज्यसभेच्या या दोन जागा जिंकण्यात अडचणी येऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.