नवी दिल्ली - हरियाणा आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशवारीला गेले असल्याची माहिती पुढे आली आहे. २१ ऑक्टोबरला दोन राज्यात निवडणुका असताना राहुल गांधी शनिवारी बँकॉकला गेले आहेत.
राहुल गांधी विस्तारा कंपनीच्या विमानाने बँकॉकला गेल्याची माहिती माध्यामांमध्ये येत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असताना पक्षाचे प्रमुख नेते परदेशवारीवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा - इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर व्यक्त केला राग, म्हणाले...
हरियाणा राज्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधीची जवळचे समजले जाणारे अशोक तनवर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - पंतप्रधानांना पत्र लिहणे हा देशद्रोह कसा असू शकतो - एम. के स्टालीन
राहुल गांधी १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. यावेळी रोड शो आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधीच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये सभा आयोजित करणार असून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम राहुल गांधी करणार आहे. मात्र, प्रचाराच्या नियोजन काळात राहुल गांधी परदेशात गेले आहेत.