हाथरस - हाथरस बलात्कार आणि मृत्यू प्रकरणात सीबीआयने आज पुन्हा एकदा, घटनेचा प्रत्यक्षदर्शी आणि ज्या शेतामध्ये पीडितेवर बलात्कार झाला होता त्या शेताचा मालक विक्रम ऊर्फ छोटूची चैकशी केली. सीबीआयच्या टीमने केवळ दोन मिनिटे चौकशी केल्याची माहिती विक्रमने दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी देखील विक्रमची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी बराचवेळ त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. मात्र आज केवळ दोन मिनिटे चौकशी केल्याचे तो म्हणाला. ज्या दिवशी बलात्काराची घटना घडली, त्या दिवशी शेताच्या आसपास सुमारे 15 लोक असल्याची माहितीही त्याने दिली.
14 सप्टेंबरला चंदपा पोलीस स्टेशनअर्तंगत असलेल्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने पीडितेला मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. या तरुणीचा उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.