ETV Bharat / bharat

देशात होतोय कोरोनाचा सामूहिक प्रसार; अखेर सरकारनेही केले मान्य

डॉ. हर्षवर्धन हे आपला साप्ताहिक वेबिनार 'संडे संवाद'मध्ये बोलत होते. यावेळी त्यांना ममता बॅनर्जींच्या दाव्याबाबत सांगत, देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचा सामूहिक प्रसार होतो आहे का, अशी विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, की, विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये तसे आढळून आले आहे...

After months of denial, govt finally admits community transmission
देशात होतोय कोरोनाचा सामूहिक प्रसार; अखेर सरकारनेही केले मान्य
author img

By

Published : Oct 18, 2020, 6:26 PM IST

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्स्मिशन (सामूहिक प्रसार) होत असल्याचे, अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी मान्य केले. मात्र हा प्रसार केवळ काही जिल्ह्यांमध्येच होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोरोनाचा सामूहिक प्रसार होत असल्याचे गेल्या आठवड्यात म्हटले होते. त्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज त्याला दुजोरा दिला.

डॉ. हर्षवर्धन हे आपला साप्ताहिक वेबिनार 'संडे संवाद'मध्ये बोलत होते. यावेळी त्यांना ममता बॅनर्जींच्या दाव्याबाबत सांगत, देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचा सामूहिक प्रसार होतो आहे का, अशी विचारणा करण्यता आली. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, की विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये तसे आढळून आले आहे. मात्र, याने घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले.

कित्येक महिन्यांनंतर केले मान्य..

गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात कोरोनाचा सामूहिक प्रसार सुरू झाला असल्याचे म्हटले जात होते. जुलैमध्ये आरोग्य मंत्रालयाने स्वतःच जारी केलेल्या एका माहितीपत्रात एप्रिल महिन्यापासूनच देशात सामूहिक प्रसार सुरू झाल्याचे म्हटले होते. मात्र, काही वेळातच हे माहितीपत्र मागे घेण्यात आले होते. यानंतर, आज आरोग्य मंत्रालयाने ही बाब मान्य केली आहे.

सणांच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन..

ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पूजा आणि दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. राज्यात कोरोनाचा सामूहिक प्रसार सुरू असून, लोकांनी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा : कोरोनासंदर्भात जागरुकता करण्यासाठी आयटीबीपी पथकाची सायकल मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.