इंदौर - सध्या देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळेच देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. यावेळी उज्जैन येथील पती पत्नी आपल्या कोरोनाबाधित मुलाला इंदौर येथील आयसोलेशन वार्डमध्ये सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते पती पत्नी इंदौरमधील आपल्या नातेनाईकांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांना नातेवाईकांनी घरात प्रवेश दिला नाही.
दरम्यान, हे दांम्पत्य त्यानंतर किती लोकांच्या संपर्कात आले यासंदर्भातली माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हे दोघेही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले असून यांच्यामुळे आणखी संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना होण्याची भीती आहे. त्यामुळे या दोघांना त्यांच्या नातेवाईकांनी घरात प्रवेश नाकारला.
त्यानंतर हे पती पत्नी रात्रभर इंदौरमधून उज्जैनला गेले. या दरम्यान त्यांना कोणीही अडवले नाही. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.