ETV Bharat / bharat

'स्रेब्रेनिका'चे स्मरण करताना... - Felicien Kabuga

हवामानाच्या अंदाजाप्रमाणेच नरसंहाराचाही अचूक अंदाज वर्तवला जाऊ शकतो. स्रेब्रेनियामध्ये झालेल्या नरसंहाराप्रमाणेच नरसंहार झाल्यानंतर प्रत्येक वेळी "असे पुन्हा होऊ द्यायचे नाही" अशा मताची एक लाट जगभरात येते; मात्र अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होतेच! असे मत जेएनयूमधील प्राध्यापक डॉ. आमिर अली यांनी व्यक्त केले आहे. पाहूयात त्यांचा हा विशेष लेख...

Acts of genocide have given rise to the rudiments of an international legal system: JNU professor
'स्रेब्रेनिका'चे स्मरण करताना...
author img

By

Published : Jul 14, 2020, 7:19 PM IST

हैदराबाद : ११ आणि १६ जुलै १९९५ दरम्यान घडलेल्या स्रेब्रेनिका हत्याकांडाला 25 वर्षे पूर्ण झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी राजवटीत ६ लाख ज्यू लोकांच्या नरसंहाराच्या भीषण घटनेनंतर स्रेब्रेनिका हे यूरोपातील हे पहिले सामूहिक हत्याकांड आहे. प्रत्येक वेळी जेव्हा स्रेब्रेनिकासारख्या एखादी नरसंहार घटना घडते तेंव्हा ‘नेव्हर अगेन’ चा नारा दिला जातो, मात्र त्यानंतर लगेचच अशा घटनांची पुनरावृत्ती होते. विशेष म्हणजे रवांडामध्ये तूट्सिसच्या भीषण नरसंहाराला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच स्रेब्रेनिका हत्याकांड घडले होते. एप्रिल ते जुलै १९९४ दरम्यान तूट्सिसमध्ये घडलेल्या हत्याकांडात ८ लाख लोक मारले गेले होते.

खरंतर मानवी नरसंहाराच्या घटना कधीच घडू नयेत. मात्र बहुतेक वेळा अशा घटनांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बाबींमध्ये आंतरराष्ट्रीय समुदाय दुर्दैवीरित्या तटस्थ भूमिका घेत असल्याने या घटना घडतात. स्रेब्रेनिकाच्या बाबतीत देखील अशीच घटना घडली. ३०० बोस्नियाई मुस्लिम पुरुषांना आश्रय देण्यास बोस्निया तयार नसताना शांततेसाठी काम करणाऱ्या डच मंडळाने कोणतीही भूमिका घेतली नाही आणि त्याचरम्यान बोस्नियन सर्ब लष्करी जनरल रॅत्को मालाडिकच्या सैन्याने ३०० लोकांना ठार केले. २०१७ मध्ये हेगमधील अपील कोर्टाने आश्रयाच्या शोधात असलेल्या ३०० माणसांच्या जीवाचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल डच शांतता मंडळ / सैन्याविरूद्ध दोषारोपण केले. विडंबन म्हणजे, संयुक्त राष्ट्राने बोस्नियाच्या सर्ब सैन्याने ठार मारलेल्या आठ हजार मुस्लिम पुरुषांच्या स्मरणार्थ स्रेब्रेनिकाला 'सेफ झोन' म्हणून घोषित केले होते.

हवामानाप्रमाणेच नरसंहाराचा देखील अंदाज वर्तविला जाऊ शकतो. सामूहिक हत्याकांडासारख्या घटना घडण्यापूर्वी सुरु असलेल्या हालचालींवरून ज्याप्रमाणे वाऱ्याची दिशा समजते त्याचप्रमाणे हत्येची दिशा स्पष्टपणे जाणवत असते. रवांडामध्ये हिंसाचार सुरु होण्याच्या अगोदर रवांडामधील (UNAMIR) संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनचे नेतृत्व करणारे कॅनेडियन मेजर-जनरल रोमिओ डॅलेर यांना या गोष्टीचा अंदाज येऊन त्यांनी याविषयीची भीती व्यक्त करणारा संदेश जगाला पाठविला होता. मात्र, जगाकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या समुदायाबद्दल स्थानिकांकडून वाढत असलेला तिरस्कार आणि त्यांना सातत्याने मिळत असलेली अमानवी वागणूक यातून डॅलेर यांच्या ही बाब लक्षात आली होती. १९९४ मध्ये जेंव्हा जगात इंटरनेटचा पूर्णपणे परिचय झालेला नव्हता आणि फेसबुकसारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अस्तित्वात येण्यास अजून दशकभराचा अवधी होता त्यावेळी द्वेष पसरवण्यासाठी नव्याने रेडिओवर सुरु करण्यात आलेल्या लिब्रे डेस मिल कोलिनेस्टॅटनच्या 'कील द कॉक्रोचेस / झुरळे मारुन टाका' या कार्यक्रमातून हा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला गेला होता. या कर्यक्रमास तूट्सिससाचा संदर्भ होता. या कर्यक्रमाला रेडिओ चॅनेलची सुरुवात करणारा आणि अर्थसहाय्य पुरवणाऱ्या फेलिसिन काबुगा नामक ८४ वर्षीय व्यक्तीला नुकतीच पॅरिसमध्ये अटक करण्यात आली. येथे तो आपली ओळख लपवून राहत होता.

जर अशा द्वेषाच्या उदयाचे स्पष्ट संकेत मिळत असतील तर या द्वेषाचा स्रोत हा एक अतिशय ओंगळ राष्ट्रवाद असू शकतो. यासाठी १९९० च्या उत्तरार्धात सर्बचे अध्यक्ष असलेले स्लोबोडन मिलोसेव्हिक यांच्या कारकीर्दीकडे पाहण्याची गरज आहे. १९९०च्या दशकात युगोस्लाव्हिया प्रजासत्ताकांमध्ये सर्ब राष्ट्रवादाला सुरुवात होण्याचे श्रेय मिलोसेव्हिक यांना जाते. स्रेब्रेनिकाचे भीषण हत्याकांड हा त्याचाच परिणाम होता. या हत्याकांडाला मिलोसेव्हिक यांना जबाबदार मानले जाते. १९८० च्या दशकात मिलोसेव्हिक हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते, परंतु नंतर त्यांनी सर्ब नॅशनॅलिझमची लोकप्रिय भूमिका निवडली. करिअरच्या प्रगतीत हा एक सोपा आणि उत्तम प्रकार होता. खरंतर १९८६ च्या दरम्यान कॉसोव्होच्या स्वायत्त प्रदेशातील मूळ सर्बियन लोकसंख्या वंशवादाच्या अडचणीत सापडली होती. त्यांना नरसंहाराचा धोका होता. कॉसोव्होच्या या अल्पसंख्याक सर्बियन नागरिकांच्या उपस्थितीला मिळालेल्या धोक्यापासून ते सर्बियामध्ये एक मोठा जनसमुदाय तयार केला गेला. एक अशी परिस्थिती होती की ज्यावेळी स्वतःच्या वंशीय गटाला नरसंहाराची भीती असताना तो गट प्रबळ होऊन विरोधक गटाविरूद्ध घडलेल्या नरसंहाराच्या गुन्ह्यास कारणीभूत ठरला आहे.

१९८९ मध्ये, जेव्हा ते सर्बियाचे अध्यक्ष बनले, तेव्हा मिलोसेव्हिक यांनी १९७४ मध्ये मंजूर केलेल्या कॉसोव्हो प्रांताच्या स्वायत्ततेचा निर्णय रद्द केला. १९९० च्या दशकात युगोस्लाव्हिया प्रजासत्ताकमध्ये जो भयंकर हिंसाचार झाला ही त्याचीच सुरुवात होती. कॉसोव्हो येथे एक अहिंसक, नागरी आंदोलन चळवळ सुरु झाली होती. बाल्कनमधील गांधी म्हणून ओळखले गेलेले इब्राहिम रुगोवा यांच्या नैतृत्वाखाली ही चळवळ सुरु होती. पुढे ते कोसोव्होचे अध्यक्ष बनले. रुगोवा यांनी पॅरिसमध्ये असताना साहित्यकार रोलँड बार्थेस यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला होता. कॉसोव्होमध्ये या प्रकारची चळवळ उभारली गेलेली असताना देखील मिलोसेव्हिकला या प्रदेशात दहशतवाद जोपासण्यापासून रोखू शकली नाही. पुढे जाऊन याच गटाने वांशिक शुद्धीकरणाच्या नावाखाली दडपशाही करण्यासाठी बहाणा आणि औचित्य शोधात नरसंहार केला.

समाजातुन मिळत असलेल्या स्पष्ट संकेतातून आणि जाणकार निरीक्षकांकडून नरसंहार होण्याची भीती व्यक्त करून देखील किंवा तसे स्पष्ट संदेश देऊन देखील तो रोखण्याची राजकीय इच्छाशक्ती फारच कमी आहे हे खूपच त्रासदायक आहे. फ्रेंच इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार जॅक सेमेलिनिन यांनी त्यांच्या 'प्युरिफाय अँड डिस्ट्रॉय : द पॉलिटिकल यूज ऑफ मॅस्केअर अँड जिनोसाइड' आणि जर्मन समाजशास्त्रज्ञ एलिझाबेथ नोएले-न्यूमन यांनी वर्णन केल्यानुसार एखाद्या समुदायाबाबत समाजात असलेली द्वेषबुद्धी हा त्या समाजाच्या नरसंहाराची घटना घडण्यापूर्वीची सूचक अशी वादळापूर्वीची शांतता असते. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये मोठी लोकसंख्या अशी असते की जे अशाप्रकारच्या द्वेषयुक्त कामात सक्रिय नसतात. एवढेच काय ते अशा कृतींना पाठिंबा देखील देत नाहीत आणि अगदी त्यांच्याशी सहमतही नसतात. मात्र, ते त्यांची याविषयीची भावना व्यक्त करण्यात किंवा निषेध नोंदविण्यात अयशस्वी ठरतात. दुसऱ्या गटाला होत असलेल्या त्रासाविषयी ममत्व असूनदेखील स्वतःच्याच गटापासून अलिप्त होण्याच्या भीतीमुळे या ते सहानुभूती देखील व्यक्त करू शकत नाहीत.

२० व्या शतकातील नरसंहाराची कहाणी अतिशय निराशाजनक आहे. महत्त्वाचे म्हणजे, अशा नरसंहाराच्या कृत्यांना रोखण्यात अयशस्वी ठरलेल्यांना दोषी ठरविण्यात आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रिया अतिशय जुनाट पद्धतीने काम करत असल्याने दोषींना पकडण्यात खूप कालावधी निघून जाते. तथापि, प्रत्येक फेलिसिन काबुगा, स्लोबोडन मिलोसेव्हिक आणि रॅत्को मालाडिक सारख्यांना अटक करून आणि खटला भरून त्यांना दोषी सिद्ध करण्यापर्यंत त्यांनी आपले जीवन पूर्णपणे उपभोगलेले असते तर कित्येकजण सहीसलामत यातून बाहेर पडतात. या लोकांना रात्रीची शांत झोप कशी लागते हेच मोठे आश्चर्य आहे.

- आमिर अली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.