इस्लामाबाद - पाकिस्तान त्यांच्या देशात बंदी असलेल्या काही संघटनावर कारवाई करत आहे. ही कारवाई कुणाच्याही दबावाखाली केली नसल्याचे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्तेआसिफ गफूर यांनी पाकिस्तानमधील माध्यमांना सांगितले.

गफूर म्हणाले, २०१४ मध्ये ठरलेल्या नॅशनल अॅक्शन प्लॅन अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई करण्यासाठी सर्व पक्षांचे एकमत झाले होते. ही कारवाई करण्यापूर्वी पुलवामा घटनादेखिल घडली नव्हती.

पाकिस्तानने ४४ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय संघटनांचा दबाव वाढल्यामुळे ही कारवाई केली, असे म्हटले जात आहे.