श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे माजी अर्थमंत्री अब्दुल रहीम राथेर यांच्या मुलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. हिलाल राथेर असे त्याचे नाव आहे. बँकेतील १७७ कोटी रूपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
'पॅराडाईज अव्हेन्यू' या आपल्या टाऊनशिप प्रकल्पासाठी त्याने २०१२ मध्ये जम्मू आणि काश्मीर बँकेकडून १७७ कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. या पैशाच्या गैरव्यवहाराप्रकरणी राथेर याला अटक करण्यात आल्याचे एसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. विशेष म्हणजे, २०१२ साली अब्दुल राथेर हे जम्मू आणि काश्मीरचे अर्थमंत्री होते.