नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने देशाच्या विविध भागात अडकेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हजारो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मुळ राज्यात परत पाठवण्यात येत आहे. राजस्थानमध्ये अ़डकलेल्या बिहार राज्यातील कामगारासह अजमेर दर्गा येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना परत पाठवण्यात आले आहे. राजस्थानहून तब्बल 1 हजार 105 जणांना घेऊन रेल्वे रवाना झाली आहे.
प्रवासादरम्यान उपासमार होऊ नये,म्हणूण कामगार आणि भक्तांसाठी प्रशासनाने जेवणाचीही व्यवस्था केली होती. अजमेर, नागौर आणि जयपूरमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्रास सहन करत असेलेल्या मजुरांना परत घरी जायला मिळत असल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. अजमेरमधील दर्गा येथे तब्बल 3 ते 4 हजार भक्त अडकले होते. त्यामधील 90 लोकांना परत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान लॉकडाऊन सुरू होऊन बरेच दिवस झाले. परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजुर आपल्या घराचं ओढीनं मैलोनमैल प्रवास करत आहेत.