ETV Bharat / bharat

एका लग्नाची गोष्ट! वधू-वराने कांद्याची वरमाला घातली एकमेंकाच्या गळ्यात - garlic

उत्तर प्रदेशमधील एका जोडप्याने आपल्या लग्नामध्ये कांदा आणि लसूणपासून बनवलेली वरमाला एकमेंकाच्या गळ्यात घालून अनोख्या मार्गाने निषेध नोंदविला

वाराणसीमधील लग्न
वाराणसीमधील लग्न
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:04 AM IST

नवी दिल्ली - कांद्याच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांद्याचे भाव वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशमधील एका जोडप्याने आपल्या लग्नामध्ये कांदा आणि लसूणपासून बनवलेली वरमाला एकमेंकाच्या गळ्यात घालून अनोख्या मार्गाने निषेध नोंदवला आहे.

गेल्या एक महिन्यापासून कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी कांद्याला मौल्यवान मानले आहे. या लग्नात पाहुण्यांनी कांद्याच्या टोपल्या भेट म्हणून दिल्या.

कांद्यासह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीविरूद्ध संदेश देण्यासाठी वधू-वरांनी ही पद्धत आखली. या जोडप्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते सत्य प्रकाश म्हणाले. कांदा दरवाढीवरून विरोधकांनी संसदेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली. कांद्याच्या वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी कंपनी एमएमटीसीकडून कांद्याची आयात करण्यात येत आहे. हा आयातीचा कांदा जानेवारीत देशात पोहोचेल.

हिंदू संस्कृतीमधील वरमालेचे महत्त्व-

हिंदू संस्कृतीमधील विवाहात अनेक सोहळे असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे. एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते. सुंदर फुलांनी ही वरमाला बनवण्यात आलेली असते. यातील फुलांचा अर्थ म्हणजे वधू-वर या दोघांचे जीवन हसत खेळत आणि आनंदाने भरलेले असावे. वरमालातील फुले हे शुभ आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते.

Intro:Body:

एका लग्नाची गोष्ट! वधू-वराने कांद्याची वरमाला घातली एकमेंकाच्या गळ्यात

नवी दिल्ली -कांद्याच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.  कांद्याचे भाव वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशमधील एका जोडप्याने आपल्या लग्नामध्ये कांदा आणि लसूणपासून बनवलेली वरमाला एकमेंकाच्या गळ्यात घालून अनोख्या मार्गाने निषेध नोंदविला

गेल्या एक महिन्यापासून कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी कांद्याला मौल्यवान मानले आहे. या लग्नात पाहुण्यांनी कांद्याच्या टोपल्या भेट म्हणून दिल्या.

कांद्यासह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीविरूद्ध संदेश देण्यासाठी वधू-वरांनी ही पद्धत आखली. या जोडप्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते सत्य प्रकाश म्हणाले. कांदा दरवाढीवरून विरोधकांनी संसदेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली. कांद्याच्या वाढत्या किमतीला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी कंपनी एमएमटीसीकडून कांद्याची आयात करण्यात येत आहे. हा आयातीचा कांदा जानेवारीत देशात पोहोचेल.

हिंदू संस्कृतीमधील वरमालेचे महत्त्व-

हिंदू संस्कृतीमधील विवाहात अनेक सोहळे असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे. एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते. सुंदर फुलांनी ही वरमाला बनवण्यात आलेली असते. यातील फुलांचा अर्थ म्हणजे वधू-वर या दोघांचे जीवन हसत खेळत आणि आनंदाने भरलेले असावे. वरमालातील फुले हे शुभ आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.