अहमदाबाद - कोरोनाची सध्याची परिस्थिती बघता पुन्हा लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत बाकी सर्व बंद करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे लग्न ठरलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. मात्र, गुजरातच्या अहमदाबादमध्ये लॉकडाऊनमध्ये विना 'बँड-बाजा-बारात' एक विवाह सोहळा पार पडला.
शहरातील हतकेश्वर भागामध्ये 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह पार पडला आहे. विवाहाची तारीखही निश्चित झाली. परंतु रेशीमगाठी जुळवून येण्याअगोदरच कोरोना विषाणूचा फैलाव झाला. बघता बघता अवघ्या देशात लॉकडाऊन झाला. संपूर्ण जग थांबले. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टन्स पाळत मीत आणि चांदीनी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या अनोख्या विवाहाचे ग्रामीण भागात मोठे कौतुक होत आहे.
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश निघाले आहेत. अनेकांनी आपले लग्न दिवाळीपर्यंत लांबणीवर टाकले आहेत. कोरोनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयही बंद असल्याने रजिस्टर्ड होणारी लग्नेही बंद आहेत. कोरोनामुळे विवाह सोहळे रद्द झाल्याचा आर्थिक फटका हा वरवधू पित्यासह, भटजी, मंडप, बँडवाले, केटरर्स, घोडागाडी या व्यावसायिकांनाही बसला आहे. लग्नाची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत असल्याने अनेक जण त्रस्त झाले.