चंदीगढ - राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचकूलामधील मोरनी येथे झालेल्या जोरदार पावसामुळे घग्गर नदीला आलेल्या पुरात एक कार अडकली आहे. तेथील लोकांनी दोरीच्या सहाय्याने ही कार थांबवली असून ती बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन व्यक्ती सेंद्रीय शेती करण्यासाठी मोरनी गावाला आले होते. नदीत उभी होती. मात्र, जोरदार पाऊस आल्याने नदीला पूर आला. त्यामुळे कार नदीत अडकली. यानंतर येथील काही मंडळींनी ही कार दोरीच्या सहाय्याने थांबवली आहे. अद्यापही या कारला पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.