पाटना - राज्यातील विविध भागांमध्ये आज (मंगळवार) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वीज कोसळल्याने राज्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज कोसळल्याने नागरिक जखमी झाल्याची माहितीही समोर येत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरकार या दु: खद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे, असे आपत्ती निवारण मंत्री लक्ष्मेश्वर राय यांनी सांगितले. रोहतास 1, गया 2, पाटना 3, जहानाबाद 2, कटिहार 2, अरवल 1, शेखपुरा 1, जमुई 1, नालंदा 1 येथे मागील २४ तासांत १४ जणांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. देश आधीच कोरोना संकटाचा सामना करत असतानाा बिहारमध्ये नैसर्गिक संकट उभे राहिले.