ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये 835 प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने घेतली सुनावणी - CJI S A Bobde latest news

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने केवळ अतिमहत्त्वाच्या विषयांवर सुनावणी घेणे सुरू केले होते. १३ मेपासून न्यायालयाने जामिनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेण्यास संमती दर्शविली.

लॉकडाऊनमध्ये 835 प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने घेतली सुनावणी

author img

By

Published : May 16, 2020, 6:22 PM IST

नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात 835 केसेसवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. यातील 325 प्रकरणांवर निकाल दिला आहे. ११६ सदस्यीय खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पाडली. यापैकी ४३ खंडपीठांनी मुख्य सुनावणी तर इतर ७३ खंडपीठांनी पुनर्विचार याचिकांवर सुनावणी केली.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेंडिग केसेसबाबत वेबसाईटवर माहिती देण्यात येते. मात्र, १ एप्रिल ते १ मेदरम्यानच्या पेंडिंग केसेसबाबत कुठलेच अपडेट करण्यात आलेले नाहीत. यापूर्वीच्या महिन्यातील पेंडिंग केसेसवर नजर टाकल्यास जानेवारीत ५९,८५९ फेब्रुवारी महिन्यात ५९,६७० तर मार्च महिन्यात ६०,४६९ केसेस सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहेत, अशी माहिती देण्यात समोर आली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने केवळ अतिमहत्त्वाच्या विषयांवर सुनावणी घेणे सुरू केले होते. १३ मेपासून न्यायालयाने जामिनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेण्यास संमती दर्शविली. लॉकडाऊनदरम्यान बऱ्याच प्रकरणांची सुनावणी ऑनलाईन होत आहे.

पेंडिंग केसेस आणि लॉकडाऊनमुळे सर्वोच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्ट्या कमी केल्या आहेत. १९ जूनपर्यंत झपाट्याने काम करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.