जयपूर - राजस्थानामध्ये राष्ट्रीय महामार्ग ११ वर भीषण अपघात झाला. खासगी बस आणि मारूती व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण राजस्थानातील बिकानेर येथील रहिवासी होते.
राजस्थानात बस-व्हॅनचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू - राजस्थानात बस आणि व्हॅनचा अपघात
राजस्थानातील राष्ट्रीय महामार्ग ११ वर भीषण अपघात झाला. खासगी बस आणि मारूती व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
जयपूर - राजस्थानामध्ये राष्ट्रीय महामार्ग ११ वर भीषण अपघात झाला. खासगी बस आणि मारूती व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण राजस्थानातील बिकानेर येथील रहिवासी होते.
राजस्थानात बस आणि व्हॅनच्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू
जयपूर- राजस्थानातील राष्ट्रीय महामार्ग ११ वर भीषण अपघात झाला. खासगी बस आणि मारूती व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण राजस्थानातील बिकानेर येथील रहिवासी होते.
ओव्हरटेक करत असताना अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजलदेसर आणि परसनेऊ गावांच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच राजलदेसर पोलीस घटनास्थळी पोहचले. सर्व मृतदेह बाहेर काढून शविच्छेदनासाठी पाठवले. धडक इतकी जोरदार होती की, मारूती व्हॅनचा चेंदामेंदा झाला. बसमधील प्रवासीही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चुरू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वीनी गौतम, बिकानेरचे पोलीस अधीक्षक प्रदिप मोहन, जिल्हाधिकारी संदेश नायक घटनास्थळी आले होते. पोलिसांनी मोबाईलवरून संपर्क साधून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. ही खुप वाईट घटना आहे. बसचालकाच्या बेपरर्वाईमुळे हा अपघात, झाल्यामुळे बस मालक आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे चुरू जिल्ह्याचे अधिक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले.
Conclusion: