ETV Bharat / bharat

तामिळनाडूत 76 नवे रुग्ण; एकूण बाधित 1 हजार 596

राज्यामध्ये 1 लाख 8 हजार नागरिक होम क्वारंटाईन (विलगीकरण) करण्यात आले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत 53 हजार नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 21, 2020, 7:55 PM IST

चेन्नई - तामिळनाडू राज्यामध्ये आज (मंगळवार) दिवसभरात 76 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 596वर पोहचला आहे. तर एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. राज्यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

  • 76 persons tested positive in Tamil Nadu today, taking total number of positive cases in the state to 1,596. One death reported today; the total number of deaths till date stands at 18 now: Health Department, Government of Tamil Nadu pic.twitter.com/z0WW9DjZkM

    — ANI (@ANI) April 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यामध्ये 1 लाख 8 हजार नागरिक होम क्वारंटाईन (विलगीकरण) करण्यात आले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत 53 हजार नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. एकूण रुग्णांपैकी 940 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून 29 हजार खाटा विलगीकरणासाठी तयार ठेवण्यात आले आहेत.

देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. काल (सोमवार) दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17. 48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.