नवी दिल्ली- राजधानील स्वतंत्र नगर येथील 7 वर्षीय चिमुरड्याचा सेफ्टी टँकमध्ये पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे नाव आयुष असे आहे. मुलाचे नातेवाईक नोकरीसाठी घराबाहेर गेल्यानंतर ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आयुष आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तो जवळच असलेल्या उघड्या टँकजवळ गेला आणि त्याचा तोल गेल्याने तो टँकमध्ये पडला. तेथील लोकांनी त्याला बाहेर काढुन हरिश्चन्द्र रुग्णालयात दाखल केले. मात्र यात त्याचा मृत्यू झाला. राजधानीत मागिल काही दिवसांपासुन उघड्या सेफ्टी टँकमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यातच या घटनेने उघड्या सेफ्टी टँकचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. चा प्रकरणी नरेला पोलीस अधिक तपास करीत आहेत.