नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार ४०८ नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१ लाख ६ हजार ३४९ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासांत ५७ हजार ४६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर ८३६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५७ हजार ५४२ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत २३ लाख ३८ हजार ३६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात आज १० हजार ४४१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून, आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत.
सोमवारी तेलंगाणामध्ये १८४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेलंगाणातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ९१ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.