ETV Bharat / bharat

'भारतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज'

3 आठवड्यांचा लॉकडाऊन पुरेसा नाही. ठराविक अंतराने नागरिकांना काहीशी सूट देत दोन महिन्यापर्यंत लॉकडाऊन वाढवले तर कोरोनाचे रुग्ण कमी होईल. तसेच प्रसार कसा झाल हे लवकर शोधता येईल, असा निष्कर्ष अभ्यासातून काढला आहे.

लॉकॉडाऊन
लॉकॉडाऊन
author img

By

Published : Mar 29, 2020, 7:38 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे देशभरामध्ये 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ही संचारबंदी 49 दिवसांपर्यंत वाढवावी लागेल, असा दावा इंग्लडमधील भारतीय वंशाच्या दोन संशोधकांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एका गणितीय प्रमाणपद्धतीची मांडणी केली आहे. जर 49 दिवस संपूर्ण देशभर संचारबंदी लागू केली नाही, तर ठराविक काळाची सूट देत दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन ठेवावा लागले, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. दोघेही इंग्लडमधील केंब्रिज विद्यापीठात संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

रनजॉय अधिकारी आणि राजेश सिंग या दोन संशोधकांनी यासंबधी शोधप्रबंध सादर केला आहे. डिपार्टमेंट ऑफ एप्लाईड मॅथिमॅटिक्स आणि थिऑरोटिकल फिजिक्स विभागात ते संशोधन करत आहेत. 21 दिवसांची संचारबंदी परिणामकारक ठरणार नसून पुन्हा कोरोनाचे रुग्ण भारतात वाढणार असल्याचा निष्कर्ष त्यांनी अभ्यासातून काढला आहे.

या अभ्यासामध्ये भारतीय लोकांमधील सामाजिक सहसंबध आणि वयोगटाचाही विचार करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना प्रसार किती होईल, याचा अभ्यास करण्यात आला आहे. या शोध प्रबंधकाला 'ई एज स्ट्रक्चर्ड इम्पॅक्ट ऑफ सोशल डिस्टन्सिंग ऑन कोव्हिड 19' असे नाव देण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त आणि निरोगी नागरिकांचाही यात विचार करण्यात आला आहे.

3 आठवड्यांचा लॉकडाऊन पुरेसा नाही. ठराविक अंतराने नागरिकांना काहीशी सूट देत दोन महिन्यापर्यंत लॉकडाऊन वाढवला, तर कोरोनाचे रुग्ण कमी होतील. तसेच एकापासून दुसऱ्याला लागण कशी झाली हे लवकर शोधता येईल, असा निष्कर्ष अभ्यासातून काढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.