ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४४५; आणखी रुग्ण वाढण्याची भीती..

author img

By

Published : Apr 5, 2020, 9:54 AM IST

दिल्लीमधील एकूण कोरोनाच्या रुग्णांपैकी परदेशातून तसेच निझामुद्दीन मरकज कार्यक्रमातून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. स्थानिक संक्रमण झालेल्या लोकांची संख्या ४० आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

Coronavirus: 445 cases in Delhi, may rise further as people from Nizamuddin congregation being tested: Kejriwal
दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४४५; आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता..

नवी दिल्ली - शनिवारी दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांनी ४४५ चा टप्पा गाठला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, अद्याप याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

दिल्लीमधील एकूण कोरोनाच्या रुग्णांपैकी परदेशातून तसेच निझामुद्दीन मरकज कार्यक्रमातून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. स्थानिक संक्रमण झालेल्या लोकांची संख्या ४० आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मरकजमध्ये सहभागी असणाऱ्या सुमारे २,३०० लोकांची पुढील दोन-तीन दिवसांमध्ये कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्लीमधील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६ रुग्णांपैकी पाच जणांचे वय ६० पेक्षा अधिक होते. तसेच त्यांना कोरोनासोबतच दुसरेही दुर्धर आजार होते, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. तसेच, दिल्लीमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशी वैयक्तिक सुरक्षा साधने आणि पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. केंद्राकडून अजूनही हे किट्स पाठवण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा : 'टाळी वाजवून अन् दिवे लावून समस्या सुटणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.