श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने बुधवारी लष्कर-ए-तोयबाच्या चार सदस्यांना अटक केली आहे. 53 राष्ट्रीय रायफल दल आणि पोलिसांची संयुक्तरित्या शोधमोहिम सुरु असताना बडगाम जिल्ह्यातील पेठकोट गावातून चारही जणांना अटक करण्यात आली आहे.
शकील अहमद वानी, शौकत अहमद, अकीब मकबूल खान आणि अजाझ अहमद दार, अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 'एके-47' रायफलसह इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, चीनसोबत सिमावाद सुरु असतानाच दहशतवादी आणि पाकिस्तान सैन्याकडून सिमेवर कारवाया करण्यात येत आहेत. गेल्या महिन्यापासूनच कुपवाडा, पूंच, पीर पंजाल आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.