ETV Bharat / bharat

कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रातील ३६ मंत्री पहिल्यांदाच करणार जम्मू-काश्मीरचा दौरा - काश्मीर आंदोलन

जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारमधील ३६ मंत्री प्रथमच काश्मीरचा दौरा करणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 16, 2020, 8:19 AM IST

Updated : Jan 16, 2020, 10:35 AM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारमधील ३६ मंत्री प्रथमच काश्मीर दौरा करणार आहेत. १८ आणि २४ जानेवारी दरम्यान सरकारमधील ३६ मंत्री जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विविध ५९ ठिकाणी भेटी देणार आहेत, अशी माहिती केंद्रिय गृह मंत्रालयाने दिली आहे.

भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणांमध्ये जम्मूतील ५१ तर काश्मीरमधील ८ ठिकाणांचा समावेश आहे. काश्मीर दौरा करणारे मंत्री स्थानिक नागरिकांना केंद्र सरकाने केलेली विकास कामे आणि योजनांची माहिती देणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

केंद्रिय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतीक मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्यासह माजी सेनाप्रमुख व्ही. के. सिंग हे या मंत्रीगटामध्ये सहभागी आहेत.

list
मंत्र्याच्या नावांची यादी
५ ऑगस्ट २०१९ केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्ता काढून घेत राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नागरिकांच्या स्वांतत्र्यावर बंधने लादण्यात आली आहे. मोबाईल आणि इंटरनेट सुविधा राज्यातील अनेक भागात बंद ठेवण्यात आली आहे. काश्मीरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या पथकाने काश्मीरात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना विमानतळावरून माघारी पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षातील नेत्यांनाही काश्मीरात जाण्यापासून अनेक वेळा रोखण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या प्रतिनिधींच्या गटाने काश्मीरचा दौरा याआधी केलेला आहे.

Intro:Body:

केंद्र सरकारमधील ३६ मंत्री करणार जम्मू काश्मीरचा दौरा

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारमधील ३६ मंत्री प्रथमच काश्मीरचा दौरा करणार आहेत. १८ आणि २४ जानेवारी दरम्यान सरकारमधील ३६ मंत्री जम्मू काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील विविध ५९ ठिकाणी भेटी देणार आहेत, अशी माहिती केंद्रिय गृह मंत्रालयाने दिली आहे.

भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणांमध्ये जम्मूतील ५१ तर काश्मीरमधील ८ ठिकाणांचा समावेश आहे. काश्मीरचा दौरा करणारे मंत्री स्थानिक नागरिकांना केंद्र सरकाने केलेली विकास कामे आणि योजनांची माहिती देणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.  

केंद्रिय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतीक मंत्री महेंद्र नाथ पांडे यांच्यासह माजी सेनाप्रमुख व्ही. के सिंग हे या मंत्रीगटामध्ये सहभागी आहेत.   

५ ऑगस्ट २०१९ केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याची स्वायत्ता काढून घेत राज्याला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून काश्मीरमधील परिस्थीती तणावपूर्ण आहे. नागरिकांच्या स्वांतत्र्यावर बंधने लादण्यात आली आहे. मोबाईल आणि इंटरनेट सुविधा राज्यातील अनेक भागात बंद ठेवण्यात आली आहे.  काश्मीरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या पथकाने काश्मीरात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना विमान तळावरून माघारी पाठवण्यात आले. विरोधी पक्षातील नेत्यांना काश्मीरात जाण्यापासून अनेक वेळा रोखण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या प्रतिनिधींच्या गटाने काश्मीरचा दौरा याआधी केलेला आहे.  

Conclusion:
Last Updated : Jan 16, 2020, 10:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.