जयपुर - कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरासह देशात वेगाने पसरला आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पाहता हे लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत विदेशातून जे पर्यटक भारतात आले होते, ते राज्यात अडकले आहेत. यामध्ये चीनसह १९ देशांचे तब्बल ३५ पर्यटक हे राजस्थानमध्ये अडकले आहेत. यामध्ये काही असे पर्यटक आहेत, ज्यांच्या विझाची शेवटची तारीख समाप्त होत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या देशात परत जाता येत नाहीये. या पर्यटकांसाठी आता राजस्थान पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे. तसेच या विदेशी पर्यटकांच्या रवानगीची व्यवस्था करण्यात येत आहे.
लॉकडाऊन दरम्यान अडकलेले विदेशी पर्यटक -
देश पर्यटक संख्या स्थळ
भूटान 1 जयपुर
चीन 1 -
इटली 5 nri
ऑस्ट्रेलिया 10 जयपुर, कोटा nri
रूस 1 पुष्कर
स्वीडन 1 -
अज्ञात 1 पुष्कर
इंडोनेशिया 3 जयपुर, उदयपुर
बेल्जियम 1 जयपुर
नीदरलैंड 1 उदयपुर
पोलैंड 1 जैसलमेर
ग्रीस 1 -
अफगानिस्तान 1 रेलवे कर्मचारी
अमेरिका 1 कोटा
ब्रिटेन 2 उदयपुर, जयपुर
फ्रांस 1
मलेशिया 1 गंगानगर पासपोर्ट नाही
ब्राजील 1 जयपुर
ऑस्ट्रिया 1 जयपुर
राजस्थान पर्यटन विभागाच्या मदतीने संबधित सर्व दूतावासांसोबत संपर्क साधला आहे. तसेच, या पर्यटकांची त्यांच्या देशात रवानगी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान ईटीव्ही भारत या पर्यटकांविषयी वेळोवेळी माहिती प्रसारित करत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया येथील नागरिक निशा कुमावत यांना पर्यटन विभागाकडून जयपुर ते दिल्ली पोहचवण्यात आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दूतावासाकडून पाठण्यात आलेल्या चार्टर्ड फ्लाईट्वारे ती आपल्या देशात पोहचली. अशाचप्रकारे कॅनडाचेी ४ पर्यटक आपल्या देशात पोहचले आहेत.
राजस्थान पर्यटनाचे सहाय्यक निर्देशक उपेंद्र सिंग यांनी सांगितले, की या पर्यटकांनी आपली घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल होती. त्यानंतर संबधित देशांकडून चार्टर्ड फ्लाईट पाठवण्यात आले. याद्वारे काही पर्यटक आपल्या घरी जाऊ शकले आहेत. या पर्यटकांनी राजस्थान पर्यटन विभागाचे आभारही मानले आहेत.