नवी दिल्ली - उत्तर भारतातील खराब हवामानामुळे उत्तर रेल्वे विभागातील ३४ गाड्या उशिराने धावत आहेत. दिल्लीमधील अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ताही ढासळली आहे. परिसरात थंडीचा जोर वाढल्याने वातावरणातील दृष्यमानता कमी झाली आहे. शरहातील अनेक भागांमध्ये धुक्याची चादर पसरली आहे.
हेही वाचा - बिपीन रावत पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'
दिल्लीसह हरियाणा, पंजाब, चंदिगड, पश्चिम आणि ईशान्य उत्तर प्रदेशात तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तापमान घरसल्याने दृष्यमानता कमी झाल्याचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे.
हेही वाचा - गुजरात : कांडला इंडियन ऑईल रिफायनरीच्या जवळ स्फोट , 4 जण ठार
यावर्षी दिल्लीतील थंडीने ११८ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. ३० डिसेंबर २०१९ रोजी दिल्लीमध्ये सर्वात निचांकी तापमान नोंदवण्यात आले. आनंद विहार भागामध्ये हवेचा निर्देशांक ४३१ अंकावर पोहचला आहे. तर आर. के पूरम येथे हवा 'अती खराब' स्तरावर आली आहे. दिल्लीमध्ये १९०१ साली तापमान १० अंश सेल्सिअस खाली घसरले होते. त्यानंतर यावर्षी हा जुना रेकॉर्ड मोडीत निघाला.