जयपूर - जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यात अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, खेळाडू, चित्रपट क्षेत्रातील लोकांनी आपापल्यापरिने मदत केली आहे. याच यादीमध्ये राजस्थानच्या अलवारमधील एका तीन वर्षीय चिमुरड्याचा समावेश झाला आहे.
जेम्स चेडविक असे या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. लहानगा जेम्स वडिलांसह आपली पीगी बँक घेऊन उपविभागीय अधिकाऱयांच्या कार्यालयात दाखल झाला. तेथे त्याने आपली पैसे साठवण्याची पीगी बँक कोरोना विरोधात उपाययोजना करण्यासाठी असलेल्या निधीसाठी दिली. यामध्ये जेम्सने ३ हजार ५८२ रुपये जमा केलेले होते. त्याने दिलेली ही मदत लॉकडाऊन काळात जेवण देण्यासाठी वारण्यात येणार आहे.
हेही वाचा - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या पुढे; 53 जणांचा मृत्यू
लहानग्या जेम्सच्या कृतीचे सर्व अधिकाऱयांना कौतुक वाटले. बानसूरचे तहसीलदार जगदीश बैरवा, विकास अधिकारी मदन लाल बैरवा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनाही जेम्स सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.