ETV Bharat / bharat

53 देशांमधील 3 हजार 36 भारतीयांना कोरोनाची लागण - corona india

अमेरिकेत 28 हजार 554 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये त्या खालोखाल 21 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 16, 2020, 6:28 PM IST

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. 170पेक्षा जास्त देशांमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनाने बाधित झाले आहेत. 53 देशांमधील 3 हजार 36 भारतीयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

जगभरात आत्तापर्यंत 1 लाख 36 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 23 हजार जण पूर्णत: बरे झाले आहेत. अमेरिकेत 6 लाख 44 हजार कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर युरोपात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला आहे.

अमेरिकेत 28 हजार 554 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये त्या खालोखाल 21 हजार 645 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांनी संचारबंदी लागू केल्यामुळे परदेशी नागरिक भारतामध्ये अडकून पडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.