ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेशच्या ऊनामध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण; तबलिगी मरकझमध्ये झाले होते सहभागी - Corona cases in Himachal

हिमाचल प्रदेशच्या ऊनामध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. हे सर्व जण दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी मरकझमध्ये सहभागी झाले होते. तिन्ही रूग्णांना उपचारांसाठी टांडा येथे दाखल करण्यात आले आहे.

3 corona positive cases  found in Una District of Himachal
हिमाचल प्रदेशच्या ऊनामध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण; तबलीगी मरकझमध्ये झाले होते सहभागी
author img

By

Published : Apr 3, 2020, 11:32 AM IST

ऊना: हिमाचल प्रदेशच्या ऊनामध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. हे सर्व जण दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकझमध्ये सहभागी झाले होते. तिन्ही रूग्णांना उपचारांसाठी टांडा येथे दाखल करण्यात आले आहे.

तिन जण ऊना येथील मस्जिदीत थांबले असता यातील एकाची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे स्रावाचे नमूने टांडा येथील डॉ. राजेंद्र प्रसाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत हे सर्व जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

हिमाचल सरकारने निजामुद्दीन तबलीगी जमातमध्ये सामील झालेल्या लोकांबद्दल माहिती मिळवली आहे. प्राप्त माहितीनुसार, सरकारने मरकझमध्ये सामील झालेल्या सर्व लोकांशी संपर्क साधला आहे. त्यापैकी 168 जणांना निगराणीत ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.