नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणखी 25 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. आता कोरोनाबाधित जवानांची संख्या 42 झाली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
कायदा व सुव्यवस्थेसाठी राष्ट्रीय राजधानीच्या जामा मशिद आणि चांदनी महाल भागात तैनात असलेल्या 126 व्या बटालियनमध्ये हे कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारी 25 जवानांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी शनिवारी याच तुकडीच्या 6 जवानांना कोरोनाच संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या तुकडीत 94 जवान आहेत, त्यापैकी 5 जवानांचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही.
आरोग्य आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सीआरपीएफचे जवान देखील कोरोनाच्या तावडीत सापडत् आहेत. यापूर्वी ईस्ट दिल्लीमधील एका तुकडीतील 127 जवान कोरोनाबाधित आढळले होते.