ETV Bharat / bharat

कर्नाटक पोटनिवडणूक : १२८ अपक्षांसह २४८ उमेदवार रिंगणात - कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक

१५ जागांवरती होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये तिहेरी लढत होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी कर्नाटकात ५ डिसेंबरला मतदान होईल, तर ९ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.

248 candidates including 128 independents in fray for Karnataka by-polls
author img

By

Published : Nov 19, 2019, 1:03 PM IST

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकांसाठी २४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी १२८ उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत २४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर, उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

१५ जागांवरती होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते सर्व आमदार भाजपकडून निवडणूक लढणार आहेत.

या पोटनिवडणुकांसाठी कर्नाटकात ५ डिसेंबरला मतदान होईल, तर ९ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जानेवारीला

Intro:Body:

कर्नाटक पोटनिवडणुका : १२८ अपक्षांसह २४८ उमेदवार रिंगणात

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकांसाठी २४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी १२८ उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.१८ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत २४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर, उमेदवारी अर्ज घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

१५ जागांवरती होणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये तिहेरी लढत होणार आहे.

कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिल्यानंतर त्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते सर्व आमदार भाजपकडून निवडणूक लढणार आहेत.

या पोटनिवडणुकांसाठी कर्नाटकात ५ डिसेंबरला मतदान होईल, तर ९ डिसेंबरला मतमोजणी असणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.