ETV Bharat / bharat

हाथरस घटनेच्या धक्क्यानंतर वाल्मिकी समुदायातील २३६ नागरिकांनी केले धर्मांतर

१४ तारखेला गाझियाबादमधील करहेडा परिसरात राहणाऱ्या २३६ नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. हाथरस घटनेनंतर दुखी होऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

buddhism
बौद्ध धर्म स्वीकारला
author img

By

Published : Oct 20, 2020, 10:28 PM IST

नवी दिल्ली / गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. या घटनेतील पीडिता ही वाल्मिकी या दलित समुदायातील होती. या समाजातल्या ५० कुटुंबातील २३६ नागरिकांनी हाथरस घटनेनंतर दुखी होऊन बौद्ध धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील करहेडा परिसरात ही धर्मांतराची घटना घडली.

वाल्मिकी समुदायातील २३६ नागरिकांनी केले धर्मांतर

मिळालेल्या माहितीनुसार, १४ तारखेला करहेडा परिसरात राहणाऱ्या २३६ नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. हाथरस घटनेनंतर आमच्यात भीती पसरल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले. वाल्मिकी समाज हा आर्थिकदृष्ट्या उपेक्षित असून आमच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाकारले जात असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे. १४ ऑक्टोबरचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये राजरत्न आंबेडर सर्वांना बौद्ध धर्माची दिक्षा देताना दिसत आहेत.

समाजातील इतर कुटुंबीयांशी चर्चा सुरू

वाल्मिकी समाजातील इतर लोकांशी आमची चर्चा सुरू असून काही दिवसांत ते सुद्धा बौद्ध धर्माची दिक्षा घेतील, असे या नागरिकांनी सांगितले. वाल्मिकी समाजावर कायमच अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. हाथरस पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांना तिचे शेवटचे दर्शनही घेवून दिले नाही, हा अन्याय नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काय आहे हाथरस घटना?

१४ सप्टेंबरला हाथरस जिल्ह्यातील एका गावातील दलित तरुणी शेतात गेली असता गावातील चार सवर्ण तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला गंभीर जखमी केले. तिच्या पाठीचा कणा तसेच मान मोडली. तिची जीभही कापण्यात आली होती, असा आरोप या चार तरुणांवर असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १५ दिवसांनी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.