नवी दिल्ली - इटलीच्या मिलान शहरात कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले २१८ भारतीय मायदेशी परतले आहेत. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत माहिती दिली. या नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान रविवारी सकाळी दिल्लीला दाखल झाले. या सर्व नागरिकांना भारत आणि तिबेटच्या सीमेवर असणाऱ्या छावला कँम्पमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
-
Union Minister of State for External Affairs, V Muraleedharan: 218 Indians including 211 students from Milan landed in Delhi. All will be quarantined for 14 days. Govt is committed to reaching out to Indians in distress, wherever they are. (file pic) #coronavirus pic.twitter.com/v33PalUEEy
— ANI (@ANI) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Minister of State for External Affairs, V Muraleedharan: 218 Indians including 211 students from Milan landed in Delhi. All will be quarantined for 14 days. Govt is committed to reaching out to Indians in distress, wherever they are. (file pic) #coronavirus pic.twitter.com/v33PalUEEy
— ANI (@ANI) March 15, 2020Union Minister of State for External Affairs, V Muraleedharan: 218 Indians including 211 students from Milan landed in Delhi. All will be quarantined for 14 days. Govt is committed to reaching out to Indians in distress, wherever they are. (file pic) #coronavirus pic.twitter.com/v33PalUEEy
— ANI (@ANI) March 15, 2020
-
The 218 Indians who landed from Milan, Italy at Delhi airport will be shifted to Indo-Tibetan Border Police's Chhawla camp. #coronavirus pic.twitter.com/ER6ylfLUCE
— ANI (@ANI) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The 218 Indians who landed from Milan, Italy at Delhi airport will be shifted to Indo-Tibetan Border Police's Chhawla camp. #coronavirus pic.twitter.com/ER6ylfLUCE
— ANI (@ANI) March 15, 2020The 218 Indians who landed from Milan, Italy at Delhi airport will be shifted to Indo-Tibetan Border Police's Chhawla camp. #coronavirus pic.twitter.com/ER6ylfLUCE
— ANI (@ANI) March 15, 2020
शुक्रवारी नागरी-उड्डाण मंत्रालयाच्या सह-सचिव रुबीना अली यांनी मिलानमधील भारतीयांना आणण्यासाठी विमान पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, काल (शनिवार) एअर इंडियाचे एक विमान इटलीला रवाना झाले होते. इटलीमधील सर्व नागरिकांना मायदेशी आणण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. तरीही, कोणी विद्यार्थी मागे राहिल्यास इटलीमधील दूतावासाशी ते संपर्क साधू शकतात, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते दम्मू रवी यांनी दिली होती.
इटलीमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चीनबाहेर इटली आणि इराणमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २१,१५७ रुग्ण आढळले आहेत, तर सुमारे दीड हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : सत्तेसाठी 'कमल'नाथ यांची कसोटी, उद्या करावे लागणार बहुमत सिद्ध