नवी दिल्ली - कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या धाडस आणि बहाद्दुरीला सलाम असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचे कौतुक केले. तसेच या युद्धात ज्या सैनिकांना विरमरण आले त्यांनाही नरेंद्र मोदींनी आदरांजली अर्पण केली.
आजचा दिवस ही भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देतो. भारतभुमीच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले त्यांना वंदन करतो, असे म्हणत मोदींनी सैनिकांना अभिवादन केले. २६ जुलै १९९९ ला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. हा दिवस कारगिल विजयी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आज या विजयीदिनानिमित्त राज्यसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.