तिरुवअनंतपूर - मध्यपूर्वेतील ओमान आणि कुवैत या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान कोची विमानतळावर दाखल झाले आहे. काल(शनिवार) रात्री उशिरा विमान भारतात आले. कोरोनामुळे भारतीय नागरिक पदेशांमध्ये अडकले आहेत. त्यांना माघारी आणण्यासाठी भारताने वंद भारत मिशन सुरु केले आहे.
एकूण ३६२ नागरिक माघारी भारतात परतले आहेत. यामध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. कोचीन विमानतळाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सर्व प्रवाशांची कोव्हीड १९ रॅपीड टेस्टींग करण्यात येणार आहे. नंतरच त्यांना गावी विशेष बसने गावी जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. तर १७७ प्रवाशांना घेऊन दोहावरून विमान आज सकाळी भारतात आले.