ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशच्या तुरुंगांमधील कोरोनाबाधित कैद्यांची संख्या पोहोचली १,३७९वर - उत्तर प्रदेश कोरोना कैदी

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील तुरुंगामधील सुमारे १९१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या तुरुंगात जवळपास १,४०० कैदी आहेत. यानंतर राज्यभरातील तुरुंगांमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १,३७९वर गेली आहे.

191 Uttar Pradesh jail inmates test COVID-19 positive
उत्तर प्रदेशच्या तुरुंगांमधील कोरोनाबाधित कैद्यांची संख्या पोहोचली १,३७९वर
author img

By

Published : Aug 11, 2020, 6:06 PM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील तुरुंगामधील सुमारे १९१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या तुरुंगात जवळपास १,४०० कैदी आहेत. यानंतर राज्यभरातील तुरुंगांमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १,३७९वर गेली आहे.

बस्तीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ए. के. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कोरोना बाधित व्यक्तीनेच इतरांना औषध वाटप केल्यामुळे तुरुंगात कोरोनाचा प्रसार झाला असावा. प्राथमिक तपासात ही बाब उघड झाली आहे. यानंतर सर्व पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर, वृद्ध कोरोना रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी सोमवारी बरेलीमधील एका तुरुंगातील ५६ कैद्यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. तर, गेल्या महिन्यात झांसीच्या एका तुरुंगातील १२८, आणि बल्लियाच्या एका तुरुंगातील २२८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार ८७८वर पोहोचली असून, आतापर्यंत २ हजार १२० लोकांचा बळी गेला आहे. तसेच, ७६ हजार ७२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.