ETV Bharat / bharat

'या' कलाकारांनी घेतली खासदार म्हणून शपथ

author img

By

Published : Jun 17, 2019, 7:40 PM IST

Updated : Jun 17, 2019, 9:21 PM IST

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात अनेक तारे तारकांना शपथ घेतली. खासदार म्हणून नवी सुरूवात केलेल्या या कलाकारांसह काही कलाकारांनी दुसऱ्यादा खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांच्यावर एक नजर टाकूयात.

कलाकार खासदारांनी घेतली शपथ

नवी दिल्ली - १७ व्या लोकसभेचे आज पहिले सत्र सुरू झाले. यावेळी लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यात आली. यावेळी मोठ्या आणि छोट्या पडद्यावर झळकलेल्या अनेक नव्या सिताऱ्यांनी शपथ घेतली. यामध्ये पुन्हा निवडणूक जिंकुन खासदार झालेल्यांचाही समावेश आहे.

पंजाबमधील गुरूदासपूरमधून खासदार झालेला सनी देओल संसदेत पोहोचला. अनेक देशभक्तीपर चित्रपटातून झळकलेला सनी पहिल्यांदाच खासदार म्हणून काम करीत आहे.

भोजपूरी चित्रपटातील नामांकित चेहरा रवि किशन गोरखपूरमधून विजयी झाला. या जागेवरुन पूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खासदार म्हणून निवडून येत असत. ते खासदार झाल्यानंतर ही जागा सपाच्या खात्यात गेली होती. परंतु हा गड राखण्यात रवि किशनला यश आले.

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी अनेठीतून विजय मिळवला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना हरवत त्यांनी इतिहास रचला. मागच्यावेळी त्या इथून हरल्या होत्या.

बंगली अभिनेत्री नुसरत जहाँ बसीरहाटमधून खासदार झाली आहे. तृणमुल काँग्रेसकडून तिने विजय संपादन केला. संसदेच्या बाहेर तिने फोटोशूट केल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती.

संसदेच्या बाहेर फोटोशूट करणारी दुसरी अभिनेत्री मिमी चक्रवर्तीदेखील पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत पोहोचली.

यापूर्वी खासदार असलेल्या तारकांनीही शपथ घेतली

ड्रीम गर्ल हेमा मालिनी मथूरेतून दुसऱ्यांदा खासदार बनल्या आहेत. त्यापूर्वीही त्या राज्यसभेच्या खासदार राहिल्या होत्या.

बंगाली गायक कलाकार बाबुल सुप्रिओनेही दुसऱ्यांदा खासदार म्हणून शपथ घेतली. ते दुसऱ्यांदा मंत्रीही बनले आहेत. बंगालच्या आसनसोलमधून ते खासदार म्हणून निवडून आले होते.

बॉलिवूड कलाकार अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर दुसऱ्यांदा खासदार बनल्या आहेत. चंडीगडमधून त्यांनी भजपच्या वतीने निवडणूक लढवली होती.

दिल्ली प्रदेश भाजपची धुरा सांभाळणाऱ्या मनोज तिवारी यांनीही दुसऱ्यांदा खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांनी नॉर्थ ईस्ट दिल्लीमधून विजय मिळवला होता.

आम आदमी पक्षाचे एकमेव खासदार भगवंत मान दुसऱ्यांदा खासदार बनले आहेत. पंजाबच्या संगरुर मतदार संघातून त्यांनी विजय मिळवला. पंजाबी आणि हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले असून कवी म्हणूनही ते परिचीत आहेत.

बंगाली चित्रपटाचा सुपरस्टार देव अधिकारी तृणमूल कांग्रेसच्या तिकीटावर दुसऱ्यांदा खासदार झाला आहे. पश्चिम बंगालच्या घटल लोकसभा जागेवर तो निवडून आला होता.

अभिनेत्री शताब्दी रॉय दूसऱ्यांदा लोकसभेत पोहोचली आहे. वीरभूमी लोकसभा जागेवरुन ती तृणमुल काँग्रेस तर्फे विजयी झाली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 17, 2019, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.